Posts

आरक्षणाचा घोळ..

राजेशाही संपली आणि लोकशाही आली असे आपण मागली सात दशके ऐकत आलेले आहोत. पण राजेशाही व लोकशाहीत कितीसा फ़रक असतो? राजेशाहीत राजाची हुकूमत असते असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात लाखो करोडो लोकांवर एक राजा कधीच हुकूमत गाजवू शकत नसतो. आपली हुकूमत प्रस्थापित करायला किंवा अंमलात आणायला, राजाला मोठा फ़ौजफ़ाटा किंवा नोकरशाही पदरी बाळगावी लागते आणि खरी हुकूमत तेच गाजवत असतात. लोकांची राजाच्या न्यायबुद्धीवर श्रद्धा व विश्वास असतो, त्यालाच खरेतर राजा म्हणतात. मग त्या राजाच्या नावाने जे कोणी खरीखुरी हुकूमत गाजवत असतात, ते प्रत्यक्षात खरे राज्यकर्ते असतात. ते राजाची मर्जी संभाळून वा त्याला खुश ठेवून, आपले अधिकार मिळवत असतात आणि गाजवत असतात. पण असे अंमलदार, सरदार वा नोकरशहा कधी राजाला नाराज करीत नाहीत. प्रसंगी त्याच्याशी खोटे बोलून वा त्याच्यापासून सत्य लपवून आपले राज्य चालवित असतात. अशाच एका राजाची गोष्ट गंमत म्हणून सांगितली जात असते. त्या राजाचा लाडका पोपट मेलेला असतो. पण ते सत्य राजाला कोणी सांगायचे? राजा त्या बातमीने नाराज झाला तर थेट मुंडकेच उडवून द्यायचा ना? त्यापेक्षा त्याच्यापासून सत्य लपवण्यासाठ...